काँग्रेसमध्ये भूकंप , थोरातांचा राजीनामा

 काँग्रेसमध्ये भूकंप , थोरातांचा राजीनामा

मुंबई, दि. ७  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धती वर नाराज होत गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे काँग्रेस जोडो यात्रेनंतर तीत भूकंप झल्याचेच चित्र आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत थोरात यांचा भाचा सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून सुरू झालेल्या काँग्रेस मधील वादळाने आता उग्र रूप धारण केले आहे.

तांबे यांनी निवडून आल्यावर पत्रकार परिषदेत नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करीत आपल्याला पद्धतशीरपणे पक्षातून बाहेर काढण्यासाठी आणि आपले मामा बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी कसे प्रयत्न झाले याबाबत माहिती दिली होती.

थोरातांचं पक्ष श्रेष्ठींना पत्र

यानंतर पटोले यांच्या कार्य पद्धतीवर नाराज असल्याचे थोरात यांनी काँग्रेस श्रेष्ठीना पत्र पाठवून कळविले होते, त्यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचेही थोरातानी या पत्रात म्हटले असल्याची चर्चा होती.

आज आणखी एक पाऊल उचलत थोरात यांनी विधानसभेतील गटनेते पदाचा राजीनामा दिला, हा राजीनामा आपल्या पर्यंत पोहोचला नाही असे नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे, तर दुसरीकडे थोरात यांना भाजपाने खुली ऑफर देत त्यांच्या उंचीचा योग्य मान राखला जाईल असे म्हटले आहे.

ML/KA/SL

7 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *