सास्तुर परिसराला भूकंपाचा धक्का

 सास्तुर परिसराला भूकंपाचा धक्का

उस्मानाबाद, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तुर परिसराला बुधवारी दुपारी चार वाजून 32 मिनिटांच्या सुमारास 1.8 रिश्चर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. जमिनीतून गुढ आवाज आल्यामुळे जमीन हादरली त्यामुळे नागरिक भूकंप असल्याची चर्चा करत होते.

याबाबत लातूर येथील भूकंप मापक कार्यालयात या भूकंपाची भूकंपमापक यंत्रावर एक पॉईंट आठ रिश्टर स्केल ची नोंद झाल्याची माहिती अधिकारी के. जी.परदेशी यांनी दिले आहे. हा भूकंप लोहारा तालुक्यातील सास्तूर, एकुंडी, होळी, उदतपूर, सालेगाव, तोरंबा, हराळी , रेबीचिंचोली या परिसरालाही जाणवल्याची नागरिकांतून चर्चा होती.

ML/KA/PGB
5 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *