भारतात पहिल्यांदाच होणार Earth Permanent Magnet चे उत्पादन

 भारतात पहिल्यांदाच होणार Earth Permanent Magnet चे उत्पादन

नवी दिल्ली, दि. १५ : भारत सरकार लवकरच तब्बल 7350 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन अर्थ पर्मनंट मॅग्नेटचं (REPMs) देशांतर्गत उत्पादन सुरू करत आहे. एप्रिलमध्ये आरईपीएम निर्यातीवरील चीनच्या निर्बंधांना तोंड देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा भारतातील ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रावर परिणाम झाल्यानेच भारताने रेअर अर्थ मॅग्नेट इकोसिस्टम तयार करण्यासाठी 7 वर्षांची योजना आखली आहे.

‘भारतात सिंटर्ड रेअर अर्थ पर्मनंट मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी योजना’ असे या मोहिमेचे नाव असण्याची शक्यता आहे. ही योजना सात वर्षे कार्यन्वयित राहणार असून दरवर्षी 6 टनांपर्यंत म्हणजेच 54 लाख 43 हजार किलोंहून अधिक उत्पादन क्षमता असलेली स्वदेशी उत्पादन इकोसिस्टम स्थापित केली जाईल अशी अपेक्षा आहे.

ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स, पवन ऊर्जा आणि संरक्षण यासह एनडीएफईबी (नियोडायमियम-लोह-बोरॉन) मॅग्नेटवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या महत्त्वाच्या क्षेत्रांना लक्षात घेत या योजनेचं संपूर्ण लक्ष्य व्हॅल्यू चैन विकसित करण्यावर आहे. या योजनेमध्ये एनडीपीआर ऑक्साईडचे सिंटर्ड एनडीएफईबी मॅग्नेटमध्ये रूपांतर करण्याचा समावेशही आहे.

पर्मनंट मॅग्नेट म्हणजे काय ?

पर्मनंट मॅग्नेट म्हणजे असा चुंबक जो स्वतःमध्ये कायमस्वरूपी चुंबकत्व ठेवतो. याचा उपयोग मोटर्स, जनरेटर्स, स्पीकर्स, आणि सेन्सर्समध्ये होतो. पर्मनंट मॅग्नेट (Permanent Magnet) म्हणजे कायमस्वरूपी चुंबक, जो एकदा चुंबकीय बनवला की त्याचे चुंबकत्व दीर्घकाळ टिकते. हे चुंबक बाह्य विद्युत प्रवाहाशिवाय चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात.
हे चुंबक आल्निको, फेराइट, निओडिमियम यांसारख्या धातूंपासून बनवले जातात.
यामध्ये अणूंचे चुंबकीय क्षेत्र एकाच दिशेने संरेखित असते, त्यामुळे ते स्थिर चुंबकत्व निर्माण करतात.

र्मनंट मॅग्नेटचे उपयोग
पर्मनंट मॅग्नेट विविध उपकरणांमध्ये वापरले जातात:

इलेक्ट्रिक मोटर्स: विशेषतः परमनंट मॅग्नेट ट्रॅक्शन मोटर्स रेल्वे आणि औद्योगिक ड्राइव्हमध्ये वापरल्या जातात.

जनरेटर्स: विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी.

स्पीकर्स: ध्वनी कंपन निर्माण करण्यासाठी.

सेन्सर्स आणि मीटर: चुंबकीय क्षेत्र ओळखण्यासाठी.

डोअर क्लोजर, फ्रिजचे दरवाजे: चुंबकत्वाचा वापर करून दरवाजे बंद ठेवण्यासाठी.

मॅग्नेटिक लॉक्स आणि खेळणी: सुरक्षितता आणि आकर्षणासाठी.
SL/ML/SL 15 Oct. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *