जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेत पदकांची कमाई

 जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेत पदकांची कमाई

नवी दिल्ली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): झेक रिपब्लिक मध्ये पिलसेन इथे सुरु असलेल्या जागतिक दिव्यांग तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत, भारतीय संघानं 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 3 पदकांची कमाई केली आहे. स्पर्धेचा आज शेवटचा दिवस असून भारताचे या स्पर्धेतले सर्व सामने आता संपले आहेत. Earning medals in World Paralympic Archery Championships

जी एम एम कंपाऊंड प्रकाराच्या खुल्या मिश्र दुहेरीत , भारताच्या राकेश-सरिता जोडीनं ब्राझीलच्या चराओ- गोगेल जोडीला नमवत सुवर्णपदक पटकावलं. जागतिक दिव्यांग तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात कुठल्याही प्रकारात भारतानं पटकावलेलं हे पहिलं सुवर्णपदक आहे.

महिलांच्या कंपाऊंड खुल्या प्रकाराच्या एकेरीत, तुर्कीच्या क्युअर ओझनूरकडून 138-140 असा निसटता पराभव झाल्यानंतर, सोळा वर्षांच्या शीतल देवीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

महिलांच्या कंपाऊंड खुल्या सांघिक प्रकारात, भारताच्या सरिता आणि ज्योती यांनी इराणचा 147-142 अशा गुण फरकानं पराभव करत कांस्यपदक पटकावलं.

या कामगिरीच्या सोबतच, पुढील वर्षी फ्रान्समध्ये पॅरिस इथे होणाऱ्या दिव्यांग ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीसाठी, 6 भारतीय तिरंदाज पात्र ठरले आहेत. यामध्ये, राकेश, सरिता, शीतल आणि ज्योतीसह पुरुषांच्या खुल्या रिकर्व्ह प्रकारात हरविंदर सिंग आणि महिलांच्या खुल्या रिकर्व्ह प्रकारात पूजा यांचा समावेश आहे.

ML/KA/PGB
23 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *