सायबर गुन्हाना आळा घालण्यासाठी राज्यात”ई – फोर्स”

 सायबर गुन्हाना आळा घालण्यासाठी राज्यात”ई – फोर्स”

नागपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सायबर गुन्हाना आळा घालण्यासाठी राज्यात सायबरची संपूर्ण यंत्रणा तयार करण्यात येत असून पोलिस दलातील 1 हजार तज्ञ आणि हुशार लोकांचा ई – फोर्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

1 हजार तरुण पोलिसांना प्रशिक्षित करून सायबर गुन्हाच्या विरोधात ठोस पावले उचलल्या जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राज्यात तयार करण्यात येणारे सायबर प्लॅटफॉर्म हे जगात सर्वात डायनॅमिक राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रशिक्षित लोकांचे फोर्स तयार करीत आहोत. पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन आकृतीबंध तयार करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितलं.

ML/KA/PGB 13 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *