सर्वोच्च न्यायालयाची ई-फायलिंग सुविधा आता २४ तास उपलब्ध
नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी पदभार स्विकारल्यापासून वेगवान कामांचा घडाका लावला आहे. न्यायायाचे कामकाज अद्ययावत करण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. यासाठीच ते ई-फालिंग सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होते. हे काम आता पूर्ण झाले असून न्या. चंद्रचूड यांनी नुकताच ‘ई-फाइलिंग 2.0’ सेवेचा शुभारंभ केला. यामुळे इलेक्ट्रॉनिक रूपात प्रकरणे दाखल करण्याची २४ तास सुविधा मिळेल. ज्या वकिलांकडे या सुविधा नाहीत किंवा ज्यांना तंत्रज्ञान अवगत नाही, त्यांच्यासाठी दोन सुविधा केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत.
सरन्यायाधीशांनी वकिलांना सांगितले की, आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केसेस दाखल करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातील ई-सेवा केंद्राचे उद्घाटनही त्यांनी केले. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, ‘. सर्व वकिलांना या सुविधा २४ तास उपलब्ध असतील. ज्या वकिलांना या सुविधा नाहीत आणि तंत्रज्ञानाची माहिती नाही त्यांच्या मदतीसाठी दोन सुविधा केंद्रेही उघडण्यात आली आहेत. मुख्य न्यायमूर्तींनी न्यायालयीन कामकाजाच्या सुरुवातीला सांगितले की, त्यांनी सर्व वकिलांना ‘ई-फायलिंग २.०’ वापरण्याचे आवाहन केले.
यावेळी कोर्टात उपस्थित भारत सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि इतर वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे कौतुक केले.
SL/KA/SL
13 May 2023