उपमुख्यमंत्र्यां विरोधात विरोधात फेसबुकवर गलिच्छ शब्दात पोस्ट करणाऱ्या व्यक्ती विरोधात ताडदेव पोलिस ठाण्यात तक्रार

मुंबई दि ३: उपमुख्यमंत्र्यां विरोधात गलिच्छ भाषेत आक्षेपार्य पोस्ट करणारे विरोधात आज दक्षिण मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या तमाम कार्यकर्त्यांनी मिळून ताडदेव येथील पोलीस ठाणे वरिष्ठ पोलिसांना अर्जाद्वारे तक्रार केली ह्या प्रसंगी शिंदे गटाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
ताडदेव येथील एका व्यक्तीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या बरोबर व्हिडिओच्या वर खाली गलिच्छ भाषा आणि आक्षेपार्ह शब्दात मजकूर लिहून टीका करत पोस्ट केली होती आणि तो व्हिडिओ सर्वत्र वायरल केला होता.त्यामुळे हा व्हिडिओ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पाहिल्याने दक्षिण मुंबईत एकच खळबळ मजली होती. त्याविरोधात ताडदेव पोलिस ठाण्यात शुक्रवारी शिंदे गटाकडून तक्रार करण्यात आली . त्याप्रसंगी दक्षिण मुंबई विभाग अध्यक्ष प्रवीण कोकाटे, विधानसभा संघटक उमेश वळसे , संध्या डुंबरे विधानसभा संघटक काही शाखा प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.KK/ML/MS