शिवसेना स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचा स्थापना सोहळा

मुंबई, दि ८
शिवसेनेची अंगीकृत संघटना, स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचा स्थापना सोहळा गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.०० वाजता
बिर्ला मातोश्री सभागृह, बॉम्बे हॉस्पिटल जवळ, मरिन लाईन्स, मुंबई २० येथे जल्लोषात होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला सर्व बँका, रेल्वे, माझगाव डॉक, नेवल डॉक, आयकर विभाग, पेट्रोलियम कंपन्या, पोर्ट ट्रस्ट, मेट्रो रेल, मोनो रेल्वे, एअर इंडिया, इन्शुरन्स कंपन्या, विविध खाजगी संस्था, शासकीय संस्थेतील तसेच कंपन्यांतील अनेक पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. तसेच शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. तरी आपण या स्थापना सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक शिवसेना नेते, माजी खासदार गजानन कीर्तीकर,
शिवसेना खासदार, लोकसभा गटनेते डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.KK/ML/MS