ज्ञानवापी प्रकरणात 4 महिला थेट सुप्रिम कोर्टात, केली मोठी मागणी!

 ज्ञानवापी प्रकरणात 4 महिला थेट सुप्रिम कोर्टात, केली मोठी मागणी!

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. चार महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करत वाराणसीतील ज्ञानवापी परिसराशी संबंधित 15 खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहो. या शिवाय याचिकाकर्ता महिलांनी ज्ञानवापीमध्ये दर्शन आणि पूजनाची परवानगी मिळावी, अशी मागणीही केली आहे.

ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे?वाराणसीतलं काशी विश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी मशीद प्रकरण तसं अनेक वर्षांपासून चर्चेत असलेलं प्रकरण आहे. 18 ऑगस्ट 2021 रोजी दिल्लीतल्या 5 महिलांनी वाराणसीच्या एका न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. राखी सिंह या महिलांचं नेतृत्व करत होत्या.त्यांचं म्हणणं आहे की, मशिदीच्या परिसरात श्रृंगार गौरी, भगवान गणेश, भगवान हनुमान, आदि विश्वेश्वर, नंदीजी आणि मंदिर परिसरात दिसत असलेली इतर देवी-देवतांचं दर्शन, प्रार्थना करण्याची परवानगी मिळायला हवी.ऋंगार देवी, भगवान हनुमान आणि गणेश आणि इतर देवी देवता दशाश्वमेध पोलीस स्टेशनच्या वॉर्डमधील प्लॉट क्रमांक 9130 मध्ये उपस्थित आहेत. हा प्लॉट विश्वनाथ कॉरिडोरला लागून आहे, असा या महिलांचा दावा आहे.सध्या या ठिकाणी कोर्टाच्या आदेशानंतर सर्वेक्षण करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात तिथं ‘शिवलिंग’ सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून केला जात आहे. तर ते कारंजं असल्याचा दावा मुस्लिम पक्षाकडून केला जात आहे. सध्या त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे.

PGB/ML/PGB
22 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *