अंतर योग गुरुकुलाने केला महिलां दुर्गांचा गौरव

मुंबई, दि ३: नवरात्रीच्या अष्टमी निमित्त सीएसटी येथील अंतर योग फाउंडेशन गुरुकुलाने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा दुर्गा स्वरूप मानून शास्त्रोक्त पूजनाने सन्मान करण्यात आला. त्याच दिवशी कुमारिका पूजन आणि भैरव पूजन देखील विधिवत पार पडले, ज्यात बालक आणि उपस्थित साधकांनी देवीच्या विविध रूपांचे पूजन केले. महिला शक्तीचा गौरव
अंतर योगच्या अनोख्या पद्धतीनुसार, प्रत्येक महिलेला दुर्गा देवीचे रूप मानून पाद्यपूजन करून त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य सरचिटणीस व समाजसेविका जुईली शेंडे यांना तर सौंदर्यस्पर्धा विजेती व महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत नेत्या विद्या आदमाने पोटदुखे यांना मिळाला.
तसेच केटरिंग क्षेत्रातील यशस्वी उद्योजिका निशा ठाकूर देसाई यांना तर धनश्री आर्ट ज्वेल्स व ओम इंद्राणी प्रोडक्शन्सच्या संस्थापिका धनश्री परब यांना मिळाला. तसेच
समर्पित गृहिणी व आदर्श मातृत्वासाठी सोनाइ लिंगरकर यांना देण्यात आला. तर टाटा AIG मधील वरिष्ठ व्यवस्थापक व भरतनाट्यम साधिका हर्षदा हजारे यांना मिळाला. तसेच बांधकाम व दुरुस्ती क्षेत्रातील उद्योजिका मुग्धा कानविंदे यांना तर सेवाभावी नर्स म्हणून श्रद्धा नारकर यांना तर जीएसटी विभागातील अधिकारी व सांस्कृतिक कार्यकर्ती सायली भोसले यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या सर्व महिलांचा सन्मान गुरुमाँ नीता ताई, सहसंस्थापिका रूपा ताई, आचार्य उपेंद्रजींच्या माताजी व अंतर योग महिला सेवा टीम यांच्या हस्ते करण्यात आला.
या सोहळ्यात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि दुर्गा या देवतांच्या मूर्तींवर शास्त्रोक्त पद्धतीने शक्तिशाली मंत्रांचा जप करीत अभिषेक करण्यात आला. अभिषेकावेळी अंतर योगची दुर्गासप्तशती तंत्रोक्त बीजमंत्र साधना सुद्धा करण्यात आली.
तसेच, सद्गुरु आचार्य उपेंद्रजींच्या दिव्य मार्गदर्शनाखाली महिलांनी सामूहिक अष्टमी होमही केला. अंतर योगच्या या शक्तिपूर्ण होमाद्वारे नकारात्मकता दहन होऊन आत्मशुद्धी साध्य होते, असा विश्वास उपस्थित साधकांनी व्यक्त केला .
“स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत. जिथे देवतांची पूजा केली जाते तेथेच देवता वास करतात. भगवद्गीतेत सांगितलेल्या शास्त्रोक्त दानाची संकल्पना म्हणजे ‘ॐ तत् सत्’ भावनेने केलेले दान. या पवित्र भावनेने केलेल्या कार्यालाच खरा अध्यात्मिक अर्थ आहे. आगामी काळात महिलाच राष्ट्राच्या विकासात सर्वात महत्त्वाची भूमिका निभावतील व त्यासाठी त्यांनी वेदांत शिकणे अत्यंत गरजेचे असल्याची माहिती आचार्य उपेंद्र यांनी दिली.KK/ML/MS