धुळ्यात 25 वर्षापासून सुरू आहे पुस्तक भिशीचा उपक्रम
धुळे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :2008 पासून सुरू झालेला पुस्तक भिशीचा अभिनव उपक्रम सातत्याने 25 वर्षापासून धुळ्यात विचार पुष्प विचार मंचाच्या माध्यमातून सुरू आहे . भारतीय स्त्री शक्तीच्या प्रेरणेने या वाचक मंच ची स्थापना झाली. स्त्रियांनी पुस्तक वाचावे कृतिशील राहावे या उद्देशाने महिलांनी महिलांसाठी म्हणून सुरू केलेली ही भिशी आता सदस्यांना लिहिते देखील करत आहे.
दर महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यातील शनिवारी पुस्तक भिशीचे हे सदस्य एकत्र येतात या भिशीची सुरुवात ग्रंथ गीताने होत असते यावेळी महिनाभरात स्वखर्चाने विकत घेतलेले पुस्तक वाचून या पुस्तकाचे अवलोकन तसेच पुस्तकाविषयी इतर माहिती चे आदान प्रदान सदस्य एकत्रित येत करतात यामुळे पुस्तकाविषयी कुतूहल निर्माण होऊन सदस्यांना हे पुस्तक वाचनाविषयीचे उत्सुकता निर्माण होते आणि हे पुस्तके सदस्य एकमेकांना शेअर केले जाते.
साधारणतः 2008 च्या सुमारास सुषमाताई गरुड ,रजनीताई देशपांडे, रेणुका ताई बेलपाठक, शामल ताई पाटील यांच्या पुढाकाराने वाचन चळवळीस गतिमान केले वयात अनेक वाचन प्रेमी महिलांचा सहभाग वाढू लागला या अभिनव उपक्रमात पुढे प्राचार्य शारदाताई शेवतेकर, रंजना खैरनार, माधुरी गावंडे यांचे नेतृत्व लाभले सध्या ऍड अंजली महाजनी यांच्या नेतृत्वात विचार पुष्प वाचक मंच पुढे वाटचाल करीत आहे.
पुस्तक भिशीच्या माध्यमातून सदस्यांना विविध ग्रंथांचा परिचय होऊ लागला यातून शिक्षण ,आरोग्य , स्त्री सबलीकरण, पर्यावरण, वैचारिक, अनुवादित , कथा कादंबरी अशा अनेक सकस साहित्यावर सकस मंथन होत गेली तसेच ग्रंथांची पुस्तकांची खरेदी ही होत गेली आहे. या वाचक पुष्प मंचची वाटचाल आता रोप्य महोत्सवी ठरली आहे प्रत्येकाच्या घरात ग्रंथालय तयार झाले असून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या पुस्तक प्रेमी महिला वाचनाच्या धाग्याने एकत्रित गुंफल्या गेल्या आहेत.
केवळ पुस्तक वाचण्यासाठी आणि अवलोकन करण्यासाठी एकत्रित येणे पुस्तकाचे आदान प्रदान करणे एवढाच या विचारपुष्प विचार मंचाचा हेतू नसून या माध्यमातून सदस्यांचे विविध गुणांना वाव देणे हे देखील यातून होत असते यासाठी संपूर्ण वर्षभरात साहित्य तसेच सांस्कृतिक विषयावर विविध प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजन केले जात असते यात लेखक आपल्या भेटीला , ग्रंथ परिचय, मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी मंगेश पाडगावकर त्यांच्या कवितेवर आधारित ‘ तुझे गीत गाण्यासाठी’ , कवी सुरेश भट, पु ल देशपांडे यांच्या पुस्तकावर आधारित पुलकित, खानदेशी कवित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता वर आधारित ‘ माय माझी सरस्वती….’ , संत साहित्यावर आधारित ‘ अवघा रंग एक झाला’ , कवियत्री शांता शेळके यांच्या साहित्यावर आधारित ‘तोच चंद्रमा नभात’, गो. नि . दांडेकर यांच्या साहित्य वर आधारित कार्यक्रम, पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली तसेच आत्मकथन पर असा मी असामी चे वाचन आणि सादरीकरण, नारी तू नारायणी तसेच विविध लेखकांच्या कथांवर आधारित ‘कथा तुमच्या , आमच्या…’ यासारखे अनेक सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रम देखील या मंचाने सादरीकरण केलेत व त्यास धुळेकर प्रेक्षकांचा रसिकांचा भरभरून साथ देखील मिळाली आहे मिळते आहे.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विचार पुष्प वाचक मंचच्या सदस्य असलेल्या या महिला दिवसेंदिवस प्रगल्भ होत असून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत आपल्यासारखंच इतर महिलांनी आणि युवतींनी देखील पुस्तक वाचनाकडे वळावे तसेच त्यातून आपले व्यक्तिमत्व विकसित करावे आज संदेश देत कार्यरत आहेत.
ML/KA/PGB 7 March 2024