अवकाळी पावसामुळे गावरान आंब्याची पडझड होऊन नुकसान

 अवकाळी पावसामुळे गावरान आंब्याची पडझड होऊन नुकसान

वाशिम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :काल सायंकाळच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी येथील आमराईचे प्रचंड नुकसान होऊन गावरान आंब्याची पडझड झाली. गोगरी हे गाव जिल्ह्यात गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.

९ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या गारपिटीमुळे या गावातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शासन स्तरावर आतापर्यंत कोणताही शासनाचा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेला नसून या नुकसानीचे कुठल्याही प्रकारचे पंचनामे करण्यात आलेले नाही. वसुदेव कंकने, जगण साखरे या आणि इतर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे. Due to unseasonal rain, loss of Gavran mangoes

ML/ML/PGB
10 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *