या कारणामुळे राहुल सोलापूरकर यांचे नाव पुन्हा वादात

 या कारणामुळे राहुल सोलापूरकर यांचे नाव पुन्हा वादात

पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेते आणि व्याख्याते राहुल सोलापूरकर हे काही दिवसांपूर्वींच शिवरायांच्या आग्रातून सुटकेबाबत चुकीचे विधान करून अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोठा जनक्षोभ झाला होता. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती. हे प्रकरण शमले असताना आता पुन्हा एकदा सोलापूरकरांचे नाव वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेत पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याचा प्रस्ताव आहे. पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याच्या सल्लागार समितीमध्ये राहुल सोलापूरकर यांचे देखील नाव आहे. मागील तीन वर्षांपासून पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याचे काम सुरू. हे धोरण ठरवणाऱ्या सल्लागार समितीमध्ये राहुल सोलापूरकर यांचे नाव आहे. मात्र, अजून प्रस्तावाला मंजुरी मिळाले नसल्याचे समजते. सोलापूरकर यांचे नाव आधीपासूनच या समितीत आहे. मात्र, आता त्यांचे नाव समोर आले आहे. राहुल सोलापूरकर यांच्या नावामुळे वादाची शक्यता आहे.

पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या समितीत राहुल सोलापूरकर यांचे नाव असल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांच्या नावावर आक्षेप घेतला आहे. तसेच राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पुण्याचे सांस्कृतिक धोरण आणि अंमलबजावणी यासाठी एक समिती निर्माण करण्यात आली. या समितीमध्ये ‘थोर’ इतिहास संशोधक राहुल सोलापूरकर यांना संधी देण्यात आली. आता आपल्याला कळलेच असेल की, सोलापूरकर जे बोलतो ते कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो आणि त्याला राजाश्रय कुणाचा आहे असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

SL/ML/SL

1 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *