या उपकरणामुळे दाट धुक्यातही सुरक्षित रेल्वे वाहतूक होणार शक्य

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर थंडीची चाहूल सुरु झाली आहे. थंडीचा कालावधी पर्यटनासाठीही उत्तम मानला जातो. मात्र दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने मेल- एक्सप्रेस गाड्यांची गती कमी होती. त्यामुळे लांबपल्याचा रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम पडतोय. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने मेल- एक्सप्रेस गाड्यांच्या इंजिनमध्ये धुके सुरक्षा यंत्र बसविण्यात आले आहे. त्यामुळे दाट धुक्यातही मेल- एक्सप्रेस गाड्या सुरक्षित आणि अधिक गतीने धावण्यास मदत होणार आहेत.
धुक्याच्या वातावरणामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रेल्वे गाड्यांच्या वास्तविक स्थानाच्या ५०० मीटर आधी सिग्नलचे दिशा जाहीर करून, रेल्वे चालकांना त्यांच्या गाड्या सुरक्षितपणे हाताळण्यासाठी अधिक अलर्ट देतात. त्यामुळे लोको पायलेटला धुक्याच्या वातावरणा गाड्या चालविताना मोठी मदत
सिग्नल दृश्यमानता कमी असताना रेल्वे चालकांना मदत करण्याच्या उद्देशाने, हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान मोठी मदत म्हणून काम करते, कमी दृश्यमानतेशी संबंधित जोखिम लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. धुके सुरक्षा यंत्र हे धुके जीपीएस तंत्रज्ञानावर चालते, जे रेल्वे चालकांना आगामी तीन सिग्नल्सबाबत ऑडिओ आणि व्हिज्युअल संकेतांद्वारे लोको पायलेटला आगाऊ सूचना देण्याचे काम करते.
धुक्यामुळे कमी दृश्यमानतेमुळे ट्रेनचा वेग सामान्यतः ३०-६० किमी प्रतितास दरम्यान असतो. तथापि, फॉग सेफ्टी डिव्हाईस (एफएसडी ) च्या अंमलबजावणीमुळे जास्तीत जास्त मेल- एक्सप्रेस गाड्यांचा वेग ७५ किमी प्रतितास होऊ शकतो, ज्यामुळे ट्रेनचा खोळंबा करणारा कालावधी कमी होतो आणि मेल – एक्सप्रेसच्या वक्तशीरपणा वाढतो.
SL/KA/SL
25 Dec.2023