थंडीमुळे गाई-गुऱे या आजारांनी ग्रस्त, दुग्धोत्पादन घटले
पुणे, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली आहे,येत्या काही दिवसात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. माणसांबरोबरच पाळीव जनावरांना देखील या थंडीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. आधीच राज्यातील पशुधन लंपीच्या त्रासातून नुकतेच सावरले आहे त्यातच आता थंडीच्या लाटेमुळे आजारी पडणाऱ्या जनावरांची काळजी कशी घ्यावी, या चिंतेने पशुपालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळे व कडाक्याच्या थंडीमुळे आता जनावारांध्ये ” फूट अँड माऊथ डिसीज ” अर्थात तोंडखुरी व पायखुरी (mouth to foot disease) असे विषाणूजन्य आजार हाेत आहे. वातावरणातील या बदलामुळे जनावरांनी अन्न खाणे बंद केले आहे. काहींचा मृत्यू हाेत आहे. यामुळे मात्र राज्यभरातील दूध उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगामी काळात जर थंडीच प्रमाण वाढलं तर आता कुठे नियंत्रणात आलेला लंपी आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती ही पशु वैद्यक तज्ज्ञांना वाटत आहे.
थंडीपासून आपल्या पशुधनाला वाचवण्यासाठी शेतकरी सर्वतोपरीने काळजी घेत आहेत. जनावरे आजारी असल्याचे आढळल्यास ताबडतोब स्थानिक पशुवैद्यकांना दाखला असा आदेश पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयाने जारी केला आहे.
9 Jan. 2023