पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर टँकरने पाणी देण्याची वेळ..

अकोला दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराचा चिंतेत सापडला आहे, खरीप हंगाम च्या सुरुवातीला मान्सूनचा पाऊस उशिरा आल्याने शेतकऱ्यांनी पेरणी विलंबाने केली, शेतकऱ्यांना उत्पादनात भर देणाऱ्या मूग आणि उडीद पिकांची पेरणी वेळेवर होऊ शकली नाही, जेमतेम शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कपाशी तसेच ज्वारी पिकांची पेरणी केली, मध्यतरी चांगला पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरलेले पीक हिरवेगार होऊन त्याला शेंगा लागायला सुरुवात होताच अचानक पावसाने दांडी मारली.
यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपायला सुरुवात झाल्याने पिकांना जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे, बाळापूर, पातूर बार्शीटाकळी तालुक्यातील बहुतांश भागात शेतकरी टँकरने पाणी देत आहेत.
ML/KA/SL
1 Sept. 2023