मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड, सावधानतेचा इशारा

 मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड, सावधानतेचा इशारा

सिंधुदुर्ग, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसा पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील देवगड-निपाणी राज्य मार्गावर तोंडवली- बोभाटेवाडी येथे नांदगाव तिठ्याच्या काही अंतरावर जुनाट महाकाय वटवृक्ष शुक्रवार सकाळी उन्मळून पडला. त्यामुळे देवगड-निपाणी राज्य मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे.

विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठाही खंडित झाला आहे.सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळजवळ सर्व नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे . अरुणा मध्यम पाटबंधारे धरणातील तसेच माडखोल , हरकुळ आणि कोर्ले-सातंडी पाटबंधारे प्रकल्पात पाणी वाढल्याने या ठिकाणी विसर्ग सुरू करण्यात आला असून अरुणा तसेच इतर नदयांच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील मुख्य नद्या यामध्ये तिलारी , तेरेखोल , गडनदी या नद्या भरून वाहत आहेत . जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 87.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कुडाळ तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 107.4 मिलीमीटर पाऊस पडला .काल दिवसभरात जिल्ह्यात 11 घरांची अंशतः पडझड झाली आहे तसेच एक झोपडी आणि एक गोठा यांची पडझड झाली आहे . शिरवल येथे ओहोळावर कपडे धुवायला गेलेली महिला प्रचिती कुडतरकर यांचा ओहळात पडून वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे,

ML/KA/SL

7 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *