परभणीत अतिवृष्टीमुळे पूर, अनेक गावात पाणी शिरले
परभणी, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे,बचाव कार्यासाठी भारतीय सैन्य दाखल झाले आहेत, सेलू तालुक्यातील बोथि गावातील चार नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले आहे . पुढील कारवाईसाठी जिंतूर तालुक्यातील चारठणा आणि बोर्डी गावात दाखल होणार आहे, तसेच सोनपेठ तालुक्यात 2 तरुण आडकले असल्याची माहिती मिळाली आहे.
पथकासोबत उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांच्यासह महसूल अधिकारी आणि कर्मचारी पूर परिस्थितीची पाहणी करत आहेत. जिल्ह्यातील करापरा नदीला पूर आल्याने जिंतूर तालुक्यातील कौडगाव,बोर्डी,बोरी ,नागणगाव सह अनेक गावांना पुराचा वेढा,तर अनेक घरांमध्ये पाणी आल्याने जनजीवन विस्कळित झाले ,सोयाबीन कापूस पिकात पाणी साचल्याने नुकसान तर परभणी – जिंतूर महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
ML/ML/SL
2 Sept 2024