केरळच्या किनाऱ्यावरून ड्रग्सचा कोट्यवधींचा साठा जप्त

 केरळच्या किनाऱ्यावरून ड्रग्सचा कोट्यवधींचा साठा जप्त

थिरुवनंतपुरम, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाने अरबी समुद्रात केरळच्या किनारपट्टीजवळ मोठी कारवाई केली असून इराणहून गुजरातला आणला जाणारा मोठा ड्रग्जचा साठा पकडला आहे. याची किंमत १२ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. नौदलाची गुप्तचर यंत्रणा आणि एनसीबीने (Narcotics Control Bureau) मिळून ही कारवाई केली आहे.

या छाप्यामध्ये २५०० किलो मेथॅम्फेटामाईन (methamphetamine) ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मेथॅम्फेटामाइन औषधांची खेप सापडली आहे.

नौदलाने या मालासह एका संशयित पाकिस्तानी नागरिकालाही ताब्यात घेतले आहे. देशातील ही सर्वात मोठी छापेमारी असल्याचं सांगितलं जात आहे. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा आल्याने एकच खळबळ उडाली असून या दोन्ही तपास पथकाची झोप उडाली आहे.

याप्रकरणी आता कसून तपास केला जात आहे. हे ड्रग्ज इराणहून गुजरातच्या बंदरावर आणले जात होते. तिथे पोहोचण्यापूर्वीच हे ड्रग ताब्यात घेण्यात आली आहे. या जहाजावर असलेल्या माफियाला कोची बंदरावर नेण्यात आले असून त्याची चौकशी नौदल आणि एनसीबी करत आहेत. या रॅकेटमध्ये कोण कोण सहभागी आहेत, ते कोणाला डिलिव्हर केले जाणार होते, आदींची चौकशी केली जाणार आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या कारवाईत सुमारे ३२०० किलो मेथॅम्फेटामाइन, ५०० किलो हेरॉईन आणि ५२९ किलो चरस जप्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तानातून भारतात आणल्या जाणाऱ्या अमली पदार्थांच्या विरोधात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

SL/KA/SL

14 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *