डोंबिवलीतील हायप्रोफाईल सोसायटीत सापडले २ कोटींचे ड्रग

डोंबिवलीतील हायप्रोफाईल लोढा पलावा सोसायटीत छापा टाकून 2 कोटी 12 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. कल्याण परिमंडळ-3 च्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केलीय. त्यामध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. कल्याण डोबिवलीत नशेखोरांच्या विरोधात कल्याण पोलिस परिमंडळ तीन चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी मोठी मोहिम हाती घेतली आहे. त्यांनी ड्रग्ज विरोधातील कारवाईसाठी विशेष पथकाची नेमणूक केलीयय. त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज आणि अंमली पदार्थ विकणाऱ्यांना अटक केली आहे.
या मोहिमेच्या अंतर्गत मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीपान शिंदे यांच्या नेतृत्वात मानपाडा पोलिसांनी लोढा पलावा परिसरातील डाऊन टाऊन या हाय प्रोफाईल सेासायटीत छापा टाकला. त्यावेळी एका घरातील चित्र पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन घसरली.