बंद जिनिंगमध्ये सापडली अमली पदार्थ तयार करणारी प्रयोगशाळा

 बंद जिनिंगमध्ये सापडली अमली पदार्थ तयार करणारी प्रयोगशाळा

अकोला, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील बार्शीटाकळी महागाव रोड वरील मोहम्मद शफी यांचे बंद जिनींग मध्ये काही लोक अंमली पदार्थ बनविण्याचा कारखाना चालवीत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारला असता जिनींग चे आवारातील दोन बंदीस्त खोल्या मध्ये दोन इसम वेगवेगळ्या रासायनीक द्रव्यावर रासायनीक प्रकीया करून पांढ-या रंगाचे स्पटीका सारखा पदार्थ तयार करीत असतांना सापडले आहेत.

घटनास्थळावर अमलीपदार्थ तयार करणे साठी लागणारे प्रयोग शाळा उपकरणे सिरॅमीक फनेल अशी उपकरणे जप्त करण्यात आली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी आरोपी आदील मोहम्मद शमीम अन्सार याचे सांगणे नुसार ईफीड्राईन बनवीण्यासाठी लागणारा कच्चा माल 5.500 किलोग्रॅम ईफीड्राईन अंदाजे किंमत 1 कोटी 38 लाख रुपये यासह दोन कोटी 38 लाख रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यातील मुख्य आरोपी अदील मोहम्मद शमीम , पवन माणीक, मुददनर निसार, नियाजी मुख्तार नियाजी , मोहम्मद इरफान , मो. युसुफ फिरोज खान, शब्बीर यांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपी अदील मोहम्मद शमीम अन्सार याचे विरूध्द विरूध्द 2014 मध्ये हैद्रबाद येथील आतापुरा पोलीस स्टेशन तसेच 2017 मध्ये मुबई येथील युनीट 3 येथे ईफीड्राई अमली पदार्थ तयार करण्याचा गुन्हा नोद असल्याची माहीती आहे.

आरोपी विरूध्द NDPS ACT 1985 कलम 22 (C) R/W 8(C), 25, 29 प्रमाणे पो स्टे बार्शीटाकळी येथे गुन्हया नोंद करण्यात आला असून पुढील कारवाई अकोला पोलीस करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली.

ML/ML/SL

24 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *