इस्राइली व्यापारी जहाजावर या भारतीय बंदरात ड्रोन हल्ला

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अरबी समुद्रात एका व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. हे जहाज इस्राइलचं असल्याचं सांगितलं जात असून भारताच्या मंगळुरु इथल्या बंदरावर हा हल्ला करण्यात आल्यानं जहाजावर आग लागली आहे.
या जहाजावर २० भारतीय कर्मचारी आहेत. यांच्या मदतीसाठी भारतीय नौदलानं आपलं जहाज पाठवलं आहे.
हे जहाज कच्चं तेल घेऊन सौदी अरेबियातील एका बंदरातून कर्नाटकच्या मंगळुरु बंदराच्या दिशेनं निघालं होतं. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोरबंदर इथल्या किनाऱ्यावरुन २१७ समुद्र मैलावर अरबी समुद्रात हे व्यापारी जहाज टार्गेट करण्यात आलं.
सध्या या हल्ल्यामुळं जहाजावर लागलेली आग विझली असून याच्या कामकाजावर मात्र परिणाम झाला आहे. या जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय तटरक्षक दलाचं जहाज आयसीजीएक्स विक्रमला पाचारण करण्यात आलं आहे.
संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आयसीजीएस विक्रमला भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या गस्तीवर तैनात करण्यात आलं होतं. पण या जहाजाला जेव्हा संकटात अडकलेल्या जहाजाबाबत निर्देश मिळाल्यानंतर हे जहाज मदतीसाठी रवाना झालं. या जहाजावरील सर्व सेलर हे सुरक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
SL/KA/SL
23 Dec. 2023