ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वतावर दरड कोसळली.

 ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वतावर दरड कोसळली.

अलिबाग , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वतावर दरड कोसळली आहे. गेल्या ३ ते ४ दिवसापासून रायगड जिल्हयात मुसळधार पाउस पडत असून वादळवाराही मोठ्या प्रमाणात सुटला आहे. नागरिकांच्या जीवाला धोका असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. मात्र सतत पडणारे पाउस व वादळवारा यामूळे उरणमधील ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या द्रोणागिरी पर्वताचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. सतत पडणारे पावसाचे पाणी यामुळे द्रोणागिरी डोंगर खचले असून डाऊरनगर येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड नागरिकांच्या घराजवळ कोसळली. सुदैवाने यात कोणतेही जिवितहानी झाली नाही मात्र डाउरनगर येथे माळीण किंवा इर्षाळवाडी सारखी दरड कोसळून घातपात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे डाउरनगर येथील नागरिकांच्या जिविताला भविष्यात खूप मोठा घोका निर्माण होणार आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन डाउरनगर परिसरात राहणा-या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेउन तिथे संरक्षक जाळी बसवावी अशी मागणी डाउरनगर ग्रामस्थांनी केली आहे.

ML/KA/PGB 21 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *