बस चालवताना ड्रायव्हरचा हृदयविकाराने मृत्यू, कंडक्टरमुळे वाचला प्रवाशांचा जीव

बंगळुरू महानगर परिवहन मंडळाची बस चालविताना एका चालकाला हृदयविकाराचा झटका आला. बंगळुरुच्या यशवंतपूर येथे सोमवारी बस चालवित असताना ही घटना घडली. चालक किरण (३९)नेलमंगला ते यशवंतपूर येथे बस चालत असताना मध्येच त्याच्या छातीत दुखायला लागले आणि तो बेशूद्ध पडला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चालक बस चालवताना अचानक कोसळला. यावेळी या बसच्या समोर दुसरी एक बस चालत होती, ज्याला मागून येणाऱ्या बसचा हलकासा धक्का लागला. यामुळे कंडक्टरने तात्काळ चालकाच्या केबिनकडे धाव घेतली आणि बसचा ताबा स्वतःकडे घेतला. चालकाची शूद्ध हरपलेली पाहून कंडक्टरने बसचे नियंत्रण मिळवून ती वेळीच थांबवली आणि पुढील अनर्थ टळला. चालक किरणला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *