या प्रसिद्ध शिवमंदीरात प्रवेशासाठी ड्रेसकोड लागू
उज्जैन, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या मध्यप्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशासाठी आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. गर्भगृहात जीन्स, शर्ट आणि पॅन्टवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, आता सामान्य भाविकांना केवळ ड्रेस कोडमध्येच महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश दिला जाणार आहे.
या संदर्भात श्री महाकाल महालोकाच्या नियंत्रण कक्षात जिल्हाधिकारी व श्री महाकालेश्वर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात हा निर्णय घेण्यात आला.या निर्णयानुसार पुरुषांना गर्भगृहात धोतर-सोवळं घालून प्रवेश करण्याची परवानगी, महिलांना साडी नेसणे बंधनकारक असेल.
उज्जैन महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भाविकांच्या प्रवेशाबाबत हे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
मंदिराच्या गाभार्यात जीन्स, शर्ट आणि पँटला पूर्णपणे बंदी आहे.
केवळ व्हीआयपीच नाही तर आता सर्वसामान्य भाविकांनाही केवळ भारतीय पोशाखातच गर्भगृहात प्रवेश दिला जाणार आहे.
महिलांना फक्त साडीतच प्रवेश दिला जाईल
10 वर्षांपर्यंतच्या मुली फक्त सलवार सूट घालू शकतात.
उज्जैनवासीयांना दर मंगळवारी मोफत भस्म आरती करता येणार आहे
SL/KA/SL
15 Sept. 2023