या देशात समुद्रकिनाऱ्यावर महिला-पुरुषांसाठी ड्रेस कोड लागू

 या देशात समुद्रकिनाऱ्यावर महिला-पुरुषांसाठी ड्रेस कोड लागू

सीरिया सरकारने पुरुष आणि महिलांसाठी एक नवीन ड्रेस कोड लागू केला. या अंतर्गत, महिलांना आता समुद्रकिनाऱ्यावर पूर्ण कपडे घालणे बंधनकारक असेल. पुरुषांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी शर्टलेस जाण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. मात्र स्विमिंग एरिया, हॉटेल लॉबी आणि फूड सर्व्हिस एरियाच्या बाबतीत शिथिलता देण्यात आली आहे. लोकांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पर्यटन मंत्री माझेन अल-सलहानी यांनी फेसबुकवर लिहिले आहे.

सीएनएन च्या वृत्तानुसार, माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या बंडानंतर सीरियामध्ये सत्तेवर आलेल्या अहमद अल-शारा यांच्या सरकारने देशात सांस्कृतिक बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांच्या कपड्यांशी संबंधित आदेश देखील याचाच एक भाग आहे.

पर्यटन मंत्रालयाने म्हटले आहे की,
सार्वजनिक समुद्रकिनारे आणि तलावांना भेट देणाऱ्या पर्यटकांनी आणि स्थानिकांनी शालीनता आणि समाजातील विविध घटकांच्या भावना लक्षात घेऊन पोहण्याचे कपडे घालावेत.

दरम्यान मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की पाश्चात्य शैलीतील स्विमवेअर आंतरराष्ट्रीय आणि प्रीमियम रिसॉर्ट्स किंवा ४ स्टार किंवा त्याहून अधिक रेटिंग असलेल्या हॉटेल्समध्ये आणि खाजगी समुद्रकिनारे आणि स्विमिंग पूलमध्ये घालता येतात.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *