DRDO संचालकाला ATS कडून अटक

 DRDO संचालकाला ATS कडून अटक

पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय असलेले आरोपी DRDO शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पुण्यातील ATS कार्यालयात तपासासाठी आणण्यात आले आहे. दहशतवादी विरोधी पथकाने कारवाई करत त्यांना काल अटक केली आहे. डीआरडीओचे संचालक हे पाकिस्तानच्या इंटेलिजन्सच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन त्यांनी पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हनीट्रॅपमध्ये अडकून त्यांनी संवेदनशील माहिती पाक इंटेलिजन्स ॲाफिसरला दिल्याचं एटीएसने म्हटलं आहे. निवृत्तीला सहा महिने राहिले असताना ते हनीट्रॅपमध्ये फसले. सहा महिने मोबाईलच्या माध्यमातून ते पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या महिलेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे एटीएसने त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

SL/KA/SL

5 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *