डॉ. संजय चोरडिया यांना ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्कार

पुणे, दि २ : आडकर फौंडेशनतर्फे ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने शिक्षणतज्ज्ञ, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांचा गौरव केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ सोमवार, दि. 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, महाराष्ट्र व बार कौन्सिलचे सदस्य ॲड. अविनाश आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.KK/ML/MS