डॉ. निलेश साबळेचे स्टार प्रवाह वरुन पुनरागमन

मुंबई, दि. २१ : स्टार प्रवाहवरील कार्यक्रम ‘शिट्टी वाजली रे’च्या महाअंतिम सोहळ्यात मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा डॉ. निलेश साबळे पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रचंड लोकप्रियता मिळवलेले डॉ. साबळे काही काळ विश्रांती घेत होते, पण आता ते स्टार प्रवाहवर खास पाहुणे म्हणून पुनरागमन करत आहेत. या खास एपिसोडमध्ये ते प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या त्यांच्या शैलीत “नमस्कार, सुस्वागतम!” म्हणत पुन्हा एकदा मंचावर धूम करणार आहेत. त्यांचा हा प्रवेश केवळ औपचारिक नाही, तर धमालमय आणि रंगतदार असणार आहे — कारण यात पदार्थ बनवण्याची मजा, आणि सिद्धार्थ जाधव, शशांक केतकर, अमेय वाघ यांच्यासोबत नाचगाण्याचा जल्लोष असेल.
अनेकांना वाटत होते की ते ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात दिसतील, परंतु त्यांनी स्पष्ट केले आहे की सध्या ते एका सिनेमाच्या दिग्दर्शनात गुंतले आहेत आणि त्यासाठीच त्यांनी नियमित टीव्हीवरील उपस्थितीतून विश्रांती घेतली आहे. त्यांच्या पुनरागमनाने चाहत्यांमध्ये उत्साहाचे नवीन वारे वाहू लागले आहेत आणि हे प्रकरण त्यांच्या चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने एक आनंदाचा क्षण ठरत आहे.
SL/ML/SL