डॉ. ज्योती मेटे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
बीड, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकनेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी, शिवसंग्राम राष्ट्रीय नेत्या राष्ट्रीय नेत्या ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट मध्ये प्रवेश केला. यावेळी खा. सुप्रीया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बीड येथील शिवसंग्रामचे नेते प्रभाकरराव कोलंगडे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ML/ML/SL
20 Oct. 2024