पत्रकार राजू झनके यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर

 पत्रकार राजू झनके यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मंत्रालयातील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजू झनके यांना जाहीर झाला आहे.येत्या मंगळवारी १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

विविध कारणास्तव मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेले महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार शासनाने काल रात्री उशिरा जाहीर केले.यात राजू झनके यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समजभूषण पुरस्कार २९२१-२०२२ हा जाहीर करण्यात आला आहे. मागील २५ वर्षांपासून विविध दैनिकांमध्ये काम , २३ वर्षांपासून मंत्रालय आणि विधिमंडळाचे वार्तांकन करीत असलेले झनके यांनी आठ वर्षांपासून सुरू केली एक वही एक पेन अभियान ही संकल्पना राज्यासह देशभरात लोकप्रिय झाली असून याचा समाजात हजरो गरजू विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.

महापुरुषांच्या जयंत्या
महापरिनिर्वाण दिनी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण हा उपक्रम त्यांच्या महामानव प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील आठ वर्षांपासून राबविला जात आहे.या उपक्रमाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राज्यातील मंडळे संस्था आणि विविध पक्षांनी त्यांचा हा उपक्रम उचलून धरला आहे.
या कार्यासोबतच मागील ३५ वर्षापासून समाजातील विविध घटकांच्या प्रश्नावर आवाज उचलून त्यांना न्याय देण्यासाठी शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा ,रुग्णांना,महिलांना सहकार्य तसेच मदत मिळवून देणे आदी कार्यातून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

ML/KA/SL

8 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *