डॉ. एपीजे अब्दुल कलामांवरील चित्रपटाची घोषणा, हा अभिनेता मुख्य भूमिकेत

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये खास चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन मोठ्या पडद्यावर मांडले जाणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुपरस्टार धनुष डॉ. कलाम यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती अभिषेक अग्रवाल आणि टी-सीरीजचे भूषण कुमार करतील. या चित्रपटाची पटकथा सायविन क्वाड्रास यांनी लिहिली आहे.
अभिषेक अग्रवाल म्हणाले, “कलामजींची कहाणी पडद्यावर आणणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. हा चित्रपट प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट असेल.” भूषण कुमार म्हणाले, “हा फक्त एक चित्रपट नाही, तर तो एक श्रद्धांजली आहे. डॉ. कलाम यांनी स्वप्ने, समर्पण आणि साधेपणाने राष्ट्र कसे घडवता येते हे दाखवून दिले.”