अतिवृष्टीसाठीच्या नुकसान भरपाई रक्कमेत दुप्पटीने वाढ
मुबई,दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अवकाळी पावसाचे संकट डोक्यावर घोंगावत असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. नुकसानभरपाईच्या रकमेत सरकारकडून दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल आणि वनविभागाने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जाणून घ्या नुकसानभरपाईची आधीची रक्कम आणि वाढलेली रक्कम
- जिरायती पिके – ६ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर – १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर
- बागायती पिके – १३ हजार ५०० प्रती हेक्टर – २७ हजार प्रतिहेक्टर
- बहुवार्षिक – १८ हजार प्रती हेक्टर – ३६ हजार रुपये प्रती हेक्टर
जून आणि ऑक्टोबरमहिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. यानंतर झालेल्या नुकसानीसाठी मदतीची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर त्यानंर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी अतिवृष्टी झालेल्या नुकसान भरपाईसाठी ५ हजार ४३९ कोटी एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे
15 Dec. 2022
SL/KA/SL
15 Dec. 2022