कोट्यधीश भारतीयांच्या संख्येत दुप्पटीने वाढ

 कोट्यधीश भारतीयांच्या संख्येत दुप्पटीने वाढ

Rich Man

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या देशात सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त असताना विरोधाभास म्हणजे देशातील कोट्यधीशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. वार्षिक एक कोटींपेक्षा अधिकची कमाई करणाऱ्या करदात्यांची संख्या गेल्या दोन वर्षांत वाढली आहे. मार्च 2022 पर्यंत ही संख्या दुप्पटीने वाढली आहे. हा आकडा 1.69 लाखांवर पोहचला आहे. मुल्यांकन वर्ष 2022-23 च्या टॅक्स रिटर्नच्या आकड्यांनुसार, एकूण 1,69,890 लोकांनी त्यांची वार्षिक कमाई एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यापूर्वी ही संख्या 1,14,446 इतकी होती. सर्वाधिक करोडपती महाराष्ट्र राज्यात आहे. 56,000 कोट्याधीश कुटुंब राज्यात राहतात. त्यानंतर उत्तर प्रदेशाचा क्रमांक लागतो. एका अहवालातील दाव्यानुसार, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात राज्यात त्यानंतर श्रीमंत कुटुंब आहेत. देशात एकूण 4.12 लाख सर्वाधिक श्रीमंत कुटुंब आहेत. एकूण श्रीमंतांमधील 46 टक्के याच पाच राज्यांमध्ये राहतात. हुरून इंडियाने (Hurun India) 2020 मध्ये भारतातील श्रीमंतींचा अहवाल दिला होता.

400 दशलक्ष अमेरिकी डॉलर GSDP सह महाराष्ट्र भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र देशातील तिसरे राज्य आहे. या ठिकाणी 45 टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते. बॉलिवूड, अभिनेता, अभिनेत्री, मोठे उद्योजक, लोकप्रिय व्यक्ती मुंबईत राहतात. मुल्यांकन वर्ष 2022-23 मध्ये आयकर भरण्यात पण महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यात 1.98 कोटी आयकर रिटर्न दाखल करण्यात आला. त्यानंतर उत्तर प्रदेश (75.72 लाख), गुजरात (75.62 लाख) आणि राजस्थान (50.88 लाख) यांचा क्रमांक लागतो. पश्चिम बंगाल मधील 47.93 लाख, तमिलनाडूमधील 47.91 लाख, कर्नाटकमध्ये 42.82 लाख, आंध्र प्रदेशातील 40.09 लाख आयकर रिटर्न फाईल करण्यात आले.

मुल्यांकन वर्ष 2020-21 मध्ये 81,653 व्यक्तींनी त्यांचे उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. मुल्यांकन वर्ष 2022-23 मध्ये 2.69 लाख घटकांनी त्यांची कमाई एक कोटींपेक्षा अधिक असल्याचे दाखवले. या घटकांमध्ये व्यक्तिगत करदाते, कंपनी, फर्म आणि इतर संस्थांचा समावेश होता. मुल्यांकन वर्ष 2022-23 मधील आयटीआरची संख्या 7.78 कोटी आहे. ही संख्या मुल्यांकन वर्ष 2021-22 आणि 2020-21 मध्ये क्रमश: 7.14 कोटी आणि 7.39 कोटी होती.

SL/KA./SL

8 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *