कोरोनानंतर विठुरायाच्या खजिन्यात दुप्पटीने वाढ…

 कोरोनानंतर विठुरायाच्या खजिन्यात दुप्पटीने वाढ…

सोलापूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कष्टकरी शेतकरी आणि सर्व सामान्यांचा देव असलेल्या सावळ्या विठुरायाची श्रीमंती वाढू लागली आहे. कोरोनानंतर विठुरायाच्या देणगीत दुप्पटीने वाढ झाली.

गेल्या वर्षी विठुरायाच्या खजिन्यात 20 कोटींचे दान जमा झाले होते. यंदा 41 कोटींचे भरभरून दान जमा झाले आहे. यामध्ये दोन वर्षांत तब्बल सात किलो वजनाचे सोन्याचे तर 76 किलो चांदीच्या दागिन्याची भर पडली आहे.

खजिना झाला समृद्ध

विठुरायाच्या चरणी वाढत्या सोनं-चांदीच्या व रोख देण्यामुळे देवाचा खजिना समृध्द होवू लागला आहे. कोरोना नंतर आर्थिक चक्र वेगाने फिरू लागले आहे. त्याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे. विशेष म्हणजे ,पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस आजपर्यंतचे उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडून तब्बल 41 कोटींचे उत्पन्न 31 जानेवारी अखेर पर्यंत मिळाले आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनास आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे.Double increase in Vithuraya’s treasure after Corona…

कोरोना काळात 2020-2021 मध्ये मंदिर बंद होते. तरीही ऑनलाईनच्या माध्यमातून देवाच्या खजिन्यात 12 कोटींचे दान जमा झाले होते. मागील वर्षी 2021-2022 या आर्थिक वर्षात 20 कोटी दान जमा झाले. तर चालू आर्थिक वर्षामध्ये तब्बल ४१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने चालू वर्षाचे व पुढील वर्षाचे प्रस्तावित अंदाजपत्रक सादर करताना ६० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

ML/KA/PGB
17 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *