सर/मॅडम म्हणायचे नाही, टिचर म्हणा… बाल हक्क आयोगाचे निर्देश
तिरुअनंतपुरम, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यार्थ्यांनी शाळेतील पुरुष शिक्षकांना ‘सर’ आणि महिला शिक्षकांना ‘मॅडम’ असे न संबोधता दोघांना लिंगभाव निरपेक्ष अशा टिचर या शब्दाने संबोधित करावे असे निर्देश केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (केएससीसीपीसीआर) राज्यातील सर्व शाळांना निर्देश दिले आहेत.
सर किंवा मॅडम याऐवजी ‘टिचर’ म्हटल्यास सर्व शाळांमधील मुलांमध्ये समानतेची भावना रुजवण्यास मदत होते आणि शिक्षकांविषयीची त्यांची ओढही वाढू शकते, असेही बालहक्क आयोगाने म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांना त्यांच्या लिंगानुसार ‘सर’ आणि ‘मॅडम’ म्हणणे बंद करून भेदभाव संपवण्याची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीच्या याचिकेवर विचार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
SL/KA/SL
13 Jan 2023