बुके नको बुक द्या! IPS बिरदेव ढोणे यांचं आवाहन

कोल्हापूर, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावातील सर्वसामान्य मेंढपाळाच्या कुटुंबातील तरुण बिरदेव सिद्धाप्पा ढोणे याची निवड झाली. बिरदेव यांने UPSC परीक्षेत 551 वी रँक मिळवत IPS अधिकारी बनण्याचं स्वप्न साकार केलं आहे . त्यांच्या संघर्षमय प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्याची भेट घेऊन अभिनंदन करायला अनेक लोक उत्सुक आहेत. भेटायला येणाऱ्यांना बिरदेवने एक विशेष आवाहन केलं आहे. “मला भेटायला येताना तुम्ही फुलांचे बुके (गुच्छ) नको तर बुकं (पुस्तकं) घेऊन या असं त्यानं म्हटलंय. या पुस्तकातून गावात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय तयार करता येईल,”.त्याच्या या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.