शंकाकुशंका घेऊ नका, कुणबी प्रमाणपत्र घेणारच

जालना, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा आरक्षणासाठी 45 बलिदान दिले आता एकही बलिदान देऊ देणार नाही आणि मराठा आरक्षणासाठीची ही संधी दवडायची नाही असे आज मनोज जरांगे पाटलांनी म्हटले आहे.आजपासून जरांगे पाटलांनी 13 दिवसांचा महाराष्ट्राचा दौरा सुरू केला .या दौऱ्यात त्यांनी सर्वात आधी अंबड मधील मराठा बांधवांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. Don’t doubt, Kunbi will get certificate
आता यांनी नवीन दणका आणला समितीला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काहीच पुरावे सापडत नाही असे म्हणतात मग राज्यातील अनेक समाजाला पुरावे न घेताच आरक्षण कसे दिले असा सवाल जरांगे उपस्थित केला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सापडलेले 5 हजार पुरावे खूप आहेत असा टोला त्यांनी राज्य सरकारला हाणला.पुरावे सापडत नाही आणि हे नुसते विमान घेऊन पळतात असा चिमटाही त्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना हाणला.
आरक्षण मिळेपर्यंत राजकारण आणू नका ,शंका कुशंका घेऊ नका 40 व्या दिवशी कुणबी प्रमाणपत्र घेणारच असा निर्धार देखील जरांगे पाटलांनी अंबडच्या कार्यक्रमात व्यक्त केला.
ML/KA/PGB
30 Sep 2023