काळाराम मंदिरात झाडाच्या सालीपासून बनलेली वस्त्रे दान…
नाशिक, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिक येथील काळाराम मंदिरात आफ्रिकेच्या जंगलातील आदिवासींनी झाडाच्या साली पासून बनवलेली वस्त्रे अर्थात वल्कले दान करण्यात आली. अफ्रिकेच्या जंगलात आदीवासी लोक झाडाच्या सालींपासून वस्र बनवतात. बडोदा येथील दत्तात्रेय सप्रे महाराजांनी त्यांच्या आफ्रिकेतील स्नेहीना ही माहिती कळवली. त्यानुसार ही वस्त्रे नाशिकच्या काळाराम समंदिराच्या विश्वस्त मंडळाकडे एकादशी निमित्ताने दान करण्यात आली. Donation of clothes made from tree bark at Kalaram temple.
वनवास काळात असताना रामाने अशी वस्त्रे परिधान केल्याचा उल्लेख रामायणात आहे. नाशिक येथे रामाचे वास्तव्य होते तो काळ त्यांच्या वनवासाचा होता त्यामुळे ही वस्त्रे महत्वपूर्ण आहेत असे विश्वस्तांनी सांगितले.
ML/KA/PGB
31 July 2023