या प्रख्यात उद्योजकाकडून मुंबई IIT ला तब्बल ३१५ कोटींची देणगी

 या प्रख्यात उद्योजकाकडून मुंबई IIT ला तब्बल ३१५ कोटींची देणगी

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई या जगप्रसिद्ध संस्थेमधुन शिक्षण घेतलेले कित्येक विद्यार्थी आज देश-विदेशात नेत्रदिपक कामगिरी करत आहेत. इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेला 315 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. नीलेकणी यांनी संस्थेतून उत्तीर्ण झाल्याची 50 वर्षे पूर्ण केल्यावर ही देणगी दिली आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली.

नंदन नीलेकणी यांनी लिहिले आहे की,- आयआयटी बॉम्बे माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ आहे. या संस्थेने माझ्या सुरुवातीच्या वर्षांना आकार दिला आणि माझ्या प्रवासाचा पाया घातला. मी या प्रतिष्ठित संस्थेशी माझ्या सहवासाची 50 वर्षे साजरी करत आहे. मी पुढे पाऊल टाकण्यासाठी आणि भविष्यासाठी योगदान दिल्याबद्दल त्यांचा कृतज्ञ आहे. आयआयटी बॉम्बेला दिलेली ही देणगी केवळ आर्थिक योगदान नाही. ज्या जागेने मला खूप काही दिले आणि उद्याचे आपले जग घडवणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकीला माझी ही मानवंदना आहे.

निलेकणी यांनी यापूर्वीच आयआयटी बॉम्बेला 85 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. आत्ताची आणि आधीची देणकी एकत्र करून ही रक्कम 400 कोटी रुपये होते. देशातील कोणत्याही संस्थेला माजी विद्यार्थ्याने दिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे. नीलेकणी यांनी 1973 मध्ये IIT बॉम्बेमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवण्यासाठी प्रवेश घेतला.

IIT मुंबईने 20 जून रोजी एक प्रेस नोट प्रसिद्ध करून – नीलेकणी यांच्या देणगीचा उद्देश जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आहे. यासोबतच अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाला चालना द्यायची आहे. आम्ही या रकमेचा वापर IIT बॉम्बेमधील सर्वोत्तम टेक स्टार्टअप इकोसिस्टम विकसित करण्यासाठी करू.

यशाच्या शिखरावर पोहोचूनही पाय जमिनीवर ठेवून आपल्याला घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थेला लक्षात ठेवणारा आणि आर्थिक मदत देणारा नंदन निलकेणी यांच्या सारखा विद्यार्थी खरोखरच विरळा आहे. आयुष्यात प्रगती केल्यावर आपल्याला घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांना आपल्या ऐपती प्रमाणे मदत करायची असे जर देशातील सर्व विद्यार्थ्यांनी ठरवले तर शैक्षणिक संस्थांना अधिकाधीक गुणवंत विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ऊर्जा मिळू शकेल.

SL/KA/SL
21 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *