१८ डिसेंबरपासून काँग्रेसचे ‘Donate for desh’ अभियान

 १८ डिसेंबरपासून काँग्रेसचे ‘Donate for desh’ अभियान

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये फारसे यश पदरात न पडलेला काँग्रेस पक्ष आता लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागला आहे.2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने पक्ष निधी वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पक्ष क्राऊड फंडिंग मोहीम सुरू करणार आहे. काँग्रेसने या मोहिमेला Donate for desh’असे नाव दिले आहे. त्याची सुरुवात 18 डिसेंबरपासून दिल्लीतून होणार आहे. पक्षाने आपल्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना या मोहिमेसाठी किमान 1380 रुपयांचे योगदान देण्यास सांगितले आहे.

काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्राउड फंडिंग मोहीम सुरू होणार असल्याची माहिती दिली. वेणुगोपाल म्हणाले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला आपली ऑनलाइन क्राउडफंडिंग मोहीम, ‘डोनेट फॉर देश’ सुरू करण्याची घोषणा करताना अभिमान वाटतो. हा उपक्रम महात्मा गांधींच्या 1920-21 मधील ऐतिहासिक टिळक स्वराज निधीपासून प्रेरित आहे आणि एक चांगला भारत निर्माण करण्यासाठी आमच्या पक्षाला सक्षम बनवण्याचा उद्देश आहे. पक्षाध्यक्ष 18 डिसेंबरला दिल्लीत अधिकृतपणे प्रचाराची सुरुवात करणार आहेत.

वेणुगोपाल पुढे म्हणाले- आम्ही आमच्या प्रत्येक राज्यस्तरीय पदाधिकारी, आमचे निवडून आलेले प्रतिनिधी, DCC अध्यक्ष, PCC अध्यक्ष आणि AICC पदाधिकारी यांना किमान 1,380 रुपयांचे योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करतो.

SL/KA/SL

16 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *