डोनाल्ड ट्रम्प आयात शुल्काच्या मुद्द्यावरून भारतावर नाराज

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (५ मार्च) संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केलं. मेरिकन नागरिकांसाठी महत्त्वाचे व अमेरिकेच्या फायद्याचे अनेक निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केले.त्यांनी मेक्सिको, चीन, युक्रेन व भारत या देशांना धक्के दिले. तब्बल १ तास ३० मिनिटे केलेल्या भाषणादरम्यान ट्रम्प यांनी दोन वेळा भारताचा उल्लेख केला. आयात शुल्काच्या मुद्द्यावरून भारतावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “भारत आपल्यावर १०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादतो. हा काही योग्य निर्णय नाही. आम्हीही येत्या २ एप्रिलपासून त्यांच्यावर आयात शुल्क लादू. इथून पुढे जो देश आमच्यावर आयात शुल्क लादेल अमेरिका त्यांच्यावर तितकच आयात शुल्क (Reciprocal Tariff) लादेल. २ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.” भारतासारख्या देशांनी अमेरिकेकडून आयात शुल्क आकारण्याचा घेतलेला निर्णय अनुचित आहे, असेही ट्रम्प म्हणाले.