डोंबिवली अमुदान केमीकल्स कंपनी स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी ताब्यात

 डोंबिवली अमुदान केमीकल्स कंपनी स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी ताब्यात

मुंबई दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क) : डोंबिवली मानपाडा पोलीस ठाणे ह‌द्दीतील एमआयडीसी हद्दीत मे. अमुदान केमीकल्स प्रा. लि. या कंपनीमध्ये गुरुवारी १३:४० वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याने त्यात आतापर्यत १३ कामगार मुत्यूमुखी पडले असून ५५ लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशन येथे भा.द.वि ३०४,३२४,३२६ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानपाडा पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून गुन्हयातील मुख्य आरोपी मलया प्रदीप मेहता (वय ३८ )यास गुन्हे शाखा, ठाणे यांचेकडुन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आरोपी मलया मेहता याची आई मालती मेहता यांना गुन्हे शाखा, ठाणे यांचेकडुन नाशिक येथुन ताब्यात घेण्यात आले असुन त्यांची चौकशी करुन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. सदर गुन्हयाचा तपास मानपाडा पोलीस स्टेशन यांचेकडुन गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.

ML/ML/SL

24 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *