श्री गणेश आखाड्याच्या डॉली गुप्ता हिला कांस्यपदक…
सोलापूर दि २९ : हरिभाई देवाकरण प्रशाला , सिध्देश्वर पेठ , सोलापूर या ठिकाणी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२६ संपन्न झाली.
या स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने सुरू असलेल्या मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील महिला पैलवान कुमारी डॉली गुप्ता हिने कांस्य 🥉 पदकाची कमाई केली.
या स्पर्धेत तिचा पहिला सामना कोल्हापूरच्या राधिका ढेरे सोबत झाला या सामन्यात डॉली ला गुणांच्या कमतरतेमुळे पराभवाचा सामना करावा लागला .
कुस्ती च्या नियमा नुसार प्रतिस्पर्ध्यक फायनल मध्ये पोहोचल्यावर रिपचेस नियमा नुसार डॉली ला ब्राँज पदकाच्या लढतीसाठी संधी मिळाली . या वेळी तिची दुसरी लढत रायगड च्या वैष्णवी कुंभार सोबत झाली व या सामन्यात डॉली ने प्रतिस्पर्धकास १०-० अशा गुणांच्या फरकाने ही कुस्ती जिंकली. डॉली ची ब्राँज मेडल ची लढत नाशिक शहर च्या संस्कृती शिरसाट सोबत झाली या सामन्यात डॉली ने आक्रमक खेळी करत संस्कृती ला चितपट करून कांस्य पदक आपल्या नावी केले.
डॉली सध्या बाल-भारती का.एम.जे. पंचोलिया कॉलेज ऑफ कॉमर्स, कांदिवली (पश्चिम), येथे वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे . या स्पर्धसाठी तिला आखाड्याचे वस्ताद वसंतराव पाटील व एन.आय.एस कुस्ती प्रशिक्षक पै.वैभव माने यांचे मार्गदर्शन लाभले .ML/ML/MS