उपराजधानीत श्वानांचा सुळसुळाट, १० पट वाढली संख्या

नागपूर, दि. १४ : देशात सर्वत्रच गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. राजधानी नागपूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गेल्या सहा महिन्यांत एकट्या नागपूर शहरात श्वानदंशाच्या 5 हजारांहून अधिक घटनांची नोंद झाली आहे. या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतीच शहरातील त्रिमूर्ती नगर परिसरात एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर 4 ते 5 मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ती मुलगी गंभीर जखमी झाली आणि रक्तबंबाळ झाली.
या प्रश्नाबाबत गेल्या १९ वर्षांपासून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर एक जनहित याचिका प्रलंबित आहे. या याचिकेवर न्यायालयाने वेळोवेळी अनेक आदेश दिले आहेत, मात्र तरीही कुत्र्यांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारी समस्या कमी होण्याऐवजी दहा पटींनी वाढली आहे. याचिकेतील याचिकाकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते विजय तालेवार सांगितलं की, ‘2008 साली नागपूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या 10 हजार होती, ती आज 2025 मध्ये 1 लाखाहून अधिक झाली आहे. नसबंदीचे काम योग्य प्रकारे झाले असते, तर कुत्र्यांची संख्या दहा पटींनी कशी वाढली, असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला. यावरून प्रशासनाला उच्च न्यायालयाचीही भीती राहिली नाही, असे ते म्हणाले. हा खटला पुढील 25 वर्षे चालेल, याची अधिकाऱ्यांना खात्री असल्यामुळे ते आदेशांची अंमलबजावणी करत नाहीत,’ असा आरोप त्यांनी केला.
कुत्रा चावल्यास कोणत्या कलमाखाली एफआयआर दाखल करावा, याची पोलिसांना माहिती नाही, असे तालेवार यांनी सांगितले. प्राणीमित्र म्हणवणाऱ्या संघटनांवरही त्यांनी टीका केली. त्या संघटना केवळ आक्षेप घेतात, पण जबाबदारी घेत नाहीत. शहरातील सर्व श्वानप्रेमींनी मोकाट कुत्र्यांची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
SL/ML/SL