CAPF मध्ये तैनात होणार भारतीय प्रजातीचे श्वान

 CAPF मध्ये तैनात होणार भारतीय प्रजातीचे श्वान

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर, बेल्जियन मालिनॉइस आणि कॉकर स्पॅनियल हे सर्व विदेशी जातीचे श्वान तैनात आहेत. मात्र आता लवकरच CAPF मध्ये भारतीय प्रजातीचे श्वान तैनात करणार आहे. रामपूर हाउंड, हिमालयन माऊंटन कॅनिस आणि हिमाचली शेफर्ड यांच्यासह गड्डी, बखरवाल, तिबेटी मास्टिफ या स्वदेशी श्वानांचा केंद्रीय पोलीस दलात समावेश करण्यात येणार आहे. या श्वानांची निवड आणि प्रशिक्षणाची जबाबदारी K9 पथकावर आहे.

सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), CAPF सारखे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) पोलिसांच्या कामात मदत करण्यासाठी स्वदेशी श्वानांची भरती करण्यास तयार आहेत. रामपूर हाउंड जातीच्या श्वानांचे प्रशिक्षण अजूनही सुरू आहे. त्याचबरोबर हिमालयन माउंटन कॅनिसचे प्रशिक्षण आणि चाचणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुधोल हाउंड जातीच्या स्वदेशी श्वानाची चाचणी बीएसएफ आणि आयटीबीपीने आधीच केली आहे. सीआरपीएफ आणि बीएसएफच्या श्वान प्रशिक्षण केंद्रांमध्ये रामपूर हाउंडसारख्या श्वानांची चाचणी सुरू आहे.BSF, ITBP आणि BSF यांना हिमाचली शेफर्ड, गड्डी, बखरवाल आणि तिबेटी मास्टिफ यांसारख्या पर्वतीय श्वानांना संयुक्तपणे प्रशिक्षण देण्याचे आदेश देण्यात आले होते.

संशयित, अंमली पदार्थ आणि स्फोटके शोधणे, आयईडी शोधणे, खाणींचा तपास करणे, बनावट रोकड शोधणे, अति-जोखीम असलेल्या भागात गस्त घालणे आणि दहशतवाद्यांचा शोध घेणे या कामात पोलिसांना मदत करण्यासाठी स्वदेशी श्वान तैनात केले जाणार आहेत.

ML/KA/SL

23 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *