अशी घ्या केसांची काळजी

 अशी घ्या केसांची काळजी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :तुम्ही कोणचा शॅम्पू वापरता आणि कोणत्या पाण्याने अंघोळ करता? तसंच तुमच्या त्वचेचा प्रकार यासह अनेक कारणं यामागं असतात. Does washing your hair every day cause hair loss?

अंघोळ करताना तुमचे केस अधिक का गळतात? त्यामागची कारणं, त्यापासून बचाव कसा करायचा? अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांची त्वचातज्ज्ञ सुश्री राजेंद्रन यांनी उत्तरं दिली आहेत.

केस धुतल्यानं जास्त गळतात यात तथ्य नाही. डोक्यावरून अंघोळ करताना आपल्या काही सवयींमुळं केस गळत असतात. त्याशिवाय डोक्यावरून अंघोळ करण्याचा केस जास्त गळण्याशी तसा फारसा संबंध नाही.

तुम्ही आठवड्यातून किती वेळा डोक्यावरून अंघोळ करावी, हे व्यक्तीनुसार बदलत असतं.

जर केसांच्या मुळांमध्ये खूप तेल किंवा कोंडा अधिक राहत असेल तर दर दुसऱ्या दिवशी डोक्यावरून अंघोळ करावी.

जे लोक व्यायाम करतात आणि खूप घाम गाळतात, त्यात खेळाडुंचा समावेश आहे. त्यांनी रोज अशी अंघोळ करायलाही हरकत नाही

आपल्या त्वचेचा पीएच 5.5 (आम्लता) असतो. अशा शॅम्पूचा वापर करणं अधिक उपयोगी आहे, जो आम्लतेच्या समान स्तराच्या खूप जवळ असेल.

खूप जास्त आम्लता असल्यास केस कोरडे होऊ शकतात. शॅम्पूच्या पीएचबाबत बाटलीवरच माहिती दिलेली असते.

महिलांमध्ये आयर्नची कमतरचा असू शकते. हिमोग्लोबिनशिवाय रक्तात आयर्न किती आहे, हेही पाहायला हवे. व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळंही केसगळती होऊ शकते.

थायरॉइडची समस्याही कारणीभूत ठरू शकते. व्हिटामिन बी-12 ची कमतरताही होऊ शकते. या पोषक तत्वांसाठी सप्लिमेंट घ्यावे.

फक्त बायोटिनच्या गोळ्या केस गळती रोखू शकत नाहीत.

झिंक, सेलेनियम आणि मॅग्निशियमची कमतरता हेदेखिल याचं कारण आहे. सुका मेवा आणि बीयांचं सेवन करावं. भोपळ्याच्या बीया, बदाम, काजू हे खावं.

प्रत्येक आहारात प्रोटिनचा समावेश करावा. शाकाहारींनी सोया, पनीर आणि दही खावं. मांसाहारी असल्यास अंडी प्रोटीनचा चांगला स्त्रोत असतात.

ML/ML/PGB 24 Sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *