शिवसेनेनं कामगारांच्या प्रश्नाबाबत घेतली माझगाव डॉक व्यवस्थापनाची भेट

मुंबई, दि २४
माझगाव डॉक लढावू जहाज निर्मितीच्या कारखान्यातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करण्यासंदर्भात आज खासदार अरविंद सावंत यांनी माझगाव डॉक कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन श्री. जगमोहन, महाव्यवस्थापक श्री. श्रीनिवास सिन्हा, सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. सत्यनारायण प्रधान, उप महाव्यवस्थापक सर्वश्री प्रदीप महाडेश्वर, अरुण केदारे, आणि भारद्वाज ह्या अधिकार्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली.
या बैठकीमध्ये फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेताना सेवाज्येष्ठता न डावलता नियमित करावे.तसेच निवृत्ती वेतन (पेन्शन) संदर्भात कंपनीच्या वतीने जसे अधिकाऱ्यांच्या बाबतीत कंपनी १०% टक्के अनुदान देते तेवढेच अनुदान कामगारांच्या बाबतीतही द्यावे युटिलिटी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार नियमित सेवेत घ्यावे. फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्याना नियमित करून ३ महिन्याच्या कालावधीसाठी सेवा काळ देण्याचे आदेश रद्द करून तो एक वर्षाचा करावा अशा विविध मागण्या यावेळी व्यवस्थापना सोबत मांडल्या.
व्यवस्थापनाने सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन यासंदर्भातील आदेश लवकरच वितरित होतील असे आश्वासन दिले असल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी दिली.या बैठकीत भारतीय कामगार सेनेचे दिलीप जाधव, नामदेव नार्वेकर, किरण शिंदे, सचिन राऊळ, मनोज सिंह उपस्थित होते.
यावेळीमकामगारांनी खासदार अरविंद सावंत यांचे मनापासून आभार मानले.KK/ML/MS