ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे नीरा नदीत स्नान…

 ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे नीरा नदीत स्नान…

ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे नीरा नदीत स्नान…

सातारा, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी रथाचे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आगमन झाले, माऊलीच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले.

श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी रथाचे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आगमन झाले. नीरा नदीच्या दत्त मंदिर घाट परिसरात पारंपरिक पद्धतीने माऊलीच्या चांदीच्या पादुकांना स्नान करण्यात आले. या सोहळ्यासाठी वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले होते.

माऊलीच्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरा मध्ये हा सोहळा पार पडला .त्यानंतर सातारा जिल्ह्याच्या सीमेवर पाडेगाव येथे पालकमंत्री शंभूराजे देसाई ,खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी यासिनी नागराजन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीच्या बंदोबस्तासाठी सुमारे 900 पोलीस विविध ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे .

लोणंद येथील बाजार समितीच्या ठिकाणी माऊलीच्या पालखीचा अडीच दिवस मुक्काम राहणार आहे त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून वारकऱ्यांसाठी स्वच्छ पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद तिघांनी समन्वय राखत श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी विविध उपाय योजना केलेले आहेत. Dnyaneshwar Mauli’s feet bathed in Neera river…

ML/ML/PGB
6 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *