गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी

मुंबई, दि. १३ : राज्यातील सर्वात मोठा सार्वजनीक उत्सव म्हणजे गणेशोत्सव. हा उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महामुंबई मुंबईत हजारोंच्या संख्येने असणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. हा उत्सव सुरळीतपणे पार पडावा यासाठी राज्य शासनही सतर्क झाले आहे. उत्सव पर्यावरणपुरक व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबई पोलिसांनी ‘डीजे’चा वापर करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी ‘डीजे’ वाजवल्यास कायदेशीर कारवाईला त्यांना सामोरे जावे लागेल, असे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे, गणेशोत्सव काळात डीजेचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.’ या आदेशामुळे गणेशोत्सवातील डीजेच्या वापरावर पूर्णपणे बंदी येणार आहे. मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी या नियमांचे गांभीर्याने पालन करणे आवश्यक आहे. उत्सवात प्रदूषणकारी ध्वनिक्षेपक, डीजे लावण्यावर पर्यावरणप्रेमींचा आक्षेप असून रुग्णालय तसेच निवासी परिसरात त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.
SL/ML/SL